bhendwalbk

महाराष्ट्र शासन
GOVERNMENT OF MAHARASHTRA
English

ग्रामपंचायत भेंडवळ बु. ता जळगाव (जा) जिल्हा बुलढाणा

Gram Panchayat Bhendwal BK. Taluka Jalgaon (Ja) District Buldhana

सामान्य प्रशासन विभाग

१. सामान्य प्रशासन विभाग हा पंचायत समिती कार्यालयातील एक अत्यंत महत्त्वाचा विभाग असून, या विभागामार्फत इतर सर्व विभागांचे नियंत्रण ठेवले जाते. २. १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत “विशेष सुधारणा मोहिमे” अंतर्गत Psjalgaonj.org हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून त्यावर विविध विभागांची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ३. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्येक विभागाचा दिशादर्शक फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे. ४. नागरिक व अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ५. अभ्यागतांसाठी सुसज्ज अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. ६. ग्रामीण भागातून येणाऱ्या अभ्यागतांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ७. सर्व अभिलेखांचे विभागवार वर्गीकरण करून ड वर्गीय अभिलेखांचे निर्लेखन करण्यात आले. एकूण १०.२३ क्विंटल रद्दी पेपर निविदा प्रक्रियेद्वारे विकण्यात आले असून, त्यातून ₹८६९६/- सेस फंडात जमा करण्यात आले. ८. सन २०२३-२४ चा पंचायत समितीचा वार्षिक प्रशासन अहवाल दिनांक ११.०७.२०२४ रोजी अदा करण्यात आला आहे. (पत्र क्रमांक: /पंसज/साप्रवि/कप्रअ/८१०/२०२४) ९. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कलम ४ (ख) अन्वये १ ते १७ मुद्यांची माहिती जुलै २०२४ व जानेवारी २०२५ मध्ये प्रसिद्ध केली आहे व संकेतस्थळावरही ती उपलब्ध आहे. १०. यशवंत पंचायत राज अभियान २०२४-२५ व २०२३-२४ च्या साध्यावर आधारित परिशिष्ट ब अंतर्गत समितीची माहिती दिनांकित पत्र क्रमांक /पंसज/साप्प्रवि/यपंराअ/१३६९/२०२४ नुसार सादर करण्यात आलेली आहे. ११. सामान्य प्रशासन विभागातील आस्थापनेवरील एकूण मंजूर पदे: १०४, भरलेली पदे: ७५ व रिक्त पदे: २९ आहेत.

अधिकारी माहिती (Officers)

संतोष डामरे

सामान्य प्रशासन विभाग

Ravindra Ingle

Administrative Officer Jalgaon

Scroll to Top