महिला व बालकल्याण विभाग
१. सदर प्रकल्पाची लोकसंख्या १,३२,५७९ असून, एप्रिल २०२४ नुसार ० ते ६ वर्ष वयोगटातील सर्वेक्षित बालकांची संख्या १०,८४८ आहे. २. प्रकल्पांतर्गत एकूण १७६ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. यापैकी १४० केंद्रांना स्वतंत्र अंगणवाडी इमारती उपलब्ध आहेत. ३. या प्रकल्पामार्फत ० ते ६ महिने बालके, ६ महिने ते ३ वर्षे बालके, ३ ते ६ वर्षे बालके, तसेच गरोदर व स्तनदा माता यांना विविध पोषण योजनांचा लाभ दिला जातो. ४. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’ राबविली जात आहे, ज्यामध्ये एकूण ३३७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ५. गेल्या वर्षभरात ६ वी ते १२ वीतील मुलींना सायकल, दिव्यांग लाभार्थ्यांना पिठाची चिक्की व शिलाई मशीन यांसारख्या योजनांतर्गत लाभ देण्यात आलेला आहे.
अधिकारी माहिती (Officers)